राष्ट्रीय सेवा योजना ही सर्वांगीण विकासाची कार्यशाळा

तळेगाव ढमढेरे- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यापक समाजाचा दृष्टिकोन निर्माण होतो. त्यामुळे महाविद्यालयीन युवा पिढीने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे जिल्हा समन्वयक डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी केले.
येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना घडवणारी कार्यशाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये सहभाग घ्यावा. राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळालेला अनुभव जीवन जगताना उपयुक्त ठरतो, असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
या कार्यक्रमास इतिहास अभ्यासक डॉ. लहू गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. रवींद्र भगत, डॉ. संदीप सांगळे, डॉ.अमेय काळे, प्रा. विवेक खाबडे, प्रा. कानिफनाथ शिंदे, प्रा. दत्तात्रेय कारंडे, नामदेव भोईटे यांनी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पद्माकर गोरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. सोमनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय वाबळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)