राष्ट्रीय वयोश्री योजनेचा हजारो नागरिकांना लाभ – जगदाळे

नीरा नरसिहपूर- राष्ट्रीय वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदार संघात 25 हजार तर इंदापूर तालुक्‍यात चार हजार ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाल्याचे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.
सुरवड (ता. इंदापूर) येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे ज्येष्ठ नागरिकांना काठी, चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, व्हिल चेअर, ट्रायपॉड, कुबडी आदी साहित्यांचे वाटप जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील होते. यावेळी छाया पडसळकर, नागनाथ गायकवाड, अर्चना नलवडे, रफिया तांबोळी, रेश्‍मा सय्यद, संतोष सुतार, अर्चना बनसोडे, रूपाली पांढरे, दत्तात्रेय कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.
जगदाळे म्हणाले की, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेत 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींची तपासणी बारामती येथे केली होती. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वेगवेगळ्या गावातील जवळपास एक हजार लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)