राष्ट्रीय रायफल्सच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला

जम्मू – कुपवाडा जिल्ह्यातील कालारोस भागामध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक सैनिक जखमी झाला आहे. हल्ला झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांची शोधमोहीम हाती घेतली आहे.

दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्यातील कालारोस भागातील जंगलामध्ये असणाऱ्या लष्कराच्या मुख्यालयावर शुक्रवारी रात्री हल्ला केला . दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराला भारतीय सैन्यानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यामध्ये 21 जाट रायफलचा एक सैनिक जखमी झाला आहे. सध्या या भागामध्ये भारतीय सैन्याने नाकाबंदी केली आहे. या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी सहभागी होते, हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)