राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा; विधेयक मंजूर

नवी दिल्ली – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे महत्वपूर्ण विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या घडामोडीला मोठे राजकीय महत्व आहे.

आयोगाला घटनात्मक दर्जा देणाऱ्या घटनादुरूस्ती विधेयकावर लोकसभेत तब्बल पाच तास चर्चा झाली. त्यानंतर उपस्थित सर्व 406 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सभागृहात उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चर्चेत सहभागी झालेल्या अनेक सदस्यांनी देशातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) संख्या निश्‍चित होण्यासाठी जनगणना करण्याची मागणी केली. तर काही सदस्यांनी 2014 मधील सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्याचा आग्रह धरला. लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींसाठीच्या (एसटी) आयोगांच्या धर्तीवर घटनात्मक दर्जा उपलब्ध करण्याची तरतूद आहे.

घटनात्मक दर्जा मिळाल्यावर राष्टीय मागासवर्ग आयोगाला कुठल्या हक्कांचा भंग झाल्याशी संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाप्रमाणे अधिकार प्राप्त होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)