राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या सुरु असलेल्या विविध कामांचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. महामार्गांचे विस्तारीकरण, बायपासची कामे, उड्डाणपुलांची कामे आदींसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या कामांचे भूसंपादनाचे काम गतीने करण्यात यावे. काही ठिकाणी लोकांचा विरोध असल्यास त्यांच्या भावना लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करण्यात यावेत. तसेच प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त भरीव मोबदला देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पंढरपूर-पुणे पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पुण्यातील चांदणी चौक जंक्शन येथील काम, नाशिक फाटा ते खेड महामार्ग, सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटातील बोगदा, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग, अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांची विविध कामे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-शिर्डी मार्ग, सांगली – सोलापूर, वडखळ-अलिबाग, नागपूर जिल्ह्यातील नागपूर-उमरेड, नागपूर-काटोल, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-वणी, अकोला-अकोट, हिंगोली जिल्ह्यातील वाशिम-पांगारे-महागांव, मुंबई-गोवा महामार्ग, गुहागर- चिपळूण – कराड या मार्गांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)