राष्ट्रीय बांधिलकी म्हणून ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा

कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांचे प्रतिपादन

सातारा – माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचे जीवन सुखकर व्हावे, कुटूंब समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर जावू नये यासाठी सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी म्हणून ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करुन दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक ध्वज दिन निधी संकलन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन-2018 चा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते महासैनिक भवन येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद शिवाजी जगताप यांच्या वीर पत्नी कुसुम यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव, भानुदास झरे उपस्थित होते.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांच्या पत्नींच्या बचत गटासाठी परिवहनसाठी बसेस दिल्या होत्या. पुणे येथील पीएमटी बरोबर चर्चा सुरु असून पुढील काळात या बचत गटांसाठी 10 ते 12 बसेस देण्याचे नियोजन आहे. यामुळे माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत होणार आहे. प्रत्येक माजी सैनिकाने एक शाळा तरी दत्तक घेऊन देशभक्तीचे संस्कार शाळेतील मुलांवर करावे, असे आवाहनही कैलास शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मागील वर्षी जिल्ह्याला 1 कोटी 42 लाखांचे ध्वजनिधीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने हे उद्दिष्ट 85 टक्के म्हणजे 1 कोटी 24 लाख ध्वजदिनिधी संकलन केले आहे. माजी सैनिकांच्या पुर्वसनांच्या योजनांवर सव्वा कोटी व वसतीगृहांवर दिड कोटी खर्च केलेला आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्‍वास माळी यांनी केले तर आभार चंद्रकांत पाठक यांनी मानले. या कार्यक्रमास चंद्रकांत पवार, सुनिल नेवसे यांच्यासह माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय व पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)