राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन जानेवारीमध्ये

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था व बंधुता प्रतिष्ठानतर्फे दोन दिवसीय विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संमेलन 3 व 4 जानेवारी दरम्यान भोसरीतील इंद्रायणीनगर येथील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाचे अध्यक्ष असून प्रकाश जवळकर स्वागताध्यक्ष असल्याची, माहिती संयोजक प्रकाश रोकडे, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी, डॉ. अशोक शिंदे, महेंद्र भारती, शंकर आथरे उपस्थित होते. संमेलनाचे उद्‌घाटन गुरुवार (दि. 3) सकाळी 10 वाजता सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, प्रा. रा. ग. जाधव यांना साहित्य साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप शुक्रवार (दि. 4) सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यावेळी, ज्येष्ठ लेखक यशवंतराव गडाख व प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुणे पीपल्स सहकारी बॅंक मर्यादित यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संमेलनाच्या पहिल्या दिवशी डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रकट मुलाखत, श्‍यामची आई संस्था पुरस्कार’ रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व भोसरीतील भैरवनाथ विद्यालयाला देण्यात येणार आहे. तसेच, “थोडंसं भान असु द्या’ या विषयावर ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान होणार आहे. चौथ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव आव्हाड यांचे “संविधानिक आरक्षण व विद्यमान आरक्षण समस्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी “काव्यपंढरी’ हे कवि संमेलन होणार असून अध्यक्षस्थानी अनिल दीक्षित असणार आहेत. या संमेलनात उद्धव कानडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. भीम गायकवाड, बबन धुमाळ यांच्यासह इतर कवी सहभागी होणार आहेत.

या प्रसंगी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, दीप पारधे यांना “लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तसेच, लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांचे “स्त्रीवादी साहित्य : काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी, पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनी लांडे व आकांक्षा प्रतिष्ठानच्या राणी चौरे यांना “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ देण्यात येणार आहे. सातव्या सत्रात प्रा. तेज निवळीकर यांचे “मूल्य शिक्षणाचे पहिले मुक्त विद्यापीठ : संत गाडगेबाबा’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी, शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था व कलांगण कला संस्था यांना “राजश्री शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)