राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची निवड यादी जाहीर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची (एनटीएस) राज्यस्तरीय निवड यादी व शाळानिहाय गुणयादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. आता राष्ट्रीय स्तरावरील एनटीएस परीक्षा दि. 13 मे रोजी होणार आहे. राज्यातील 389 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यस्तरावरील एनटीएस परीक्षा दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 69 हजार 20 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेतून महाराष्ट्रासाठी 387 कोटा आहे. मात्र, राज्यस्तरीय एनटीएस परीक्षेतून 389 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. खुल्या संवर्गातून 301, अनुसूचित जाती वर्गातून 58 आणि अनुसूचित जमाती संवर्गातून 30 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती परिषदेचे आयुक्‍त सुखदेव डेरे यांनी दिली.
या परीक्षेतून पुणे विभागातून 47 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्हानिहाय पुणे 23, अहमदनगर 16 आणि सोलापुरातील 8 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच, मुंबई विभागातून 52, पुणे विभाग 47, नाशिक विभाग 40, कोल्हापूर विभाग 56, औरंगाबाद विभाग 77, अमरावती विभाग 33, नागपूर विभाग 26 आणि लातूर विभागातून 58 विद्यार्थी निवडले गेले आहेत. सर्वाधिक औरंगाबाद विभागातील विद्यार्थी असून, सर्वांत कमी संख्या नागपूर विभागाची आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)