राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासाला चालना: खुडे

रामनगर ः बक्षिस वितरणप्रसंगी शिवाजी खुडे व मान्यवर.

रामनगर, दि. 6 (प्रतिनिधी) -पानमळेवाडी अंगणवाडी क्र.150 मध्ये (बिट-वर्यें )येथे पोषण आहार सप्ताह फार मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पालकांनी पोषण आहाराचे विविध प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. यावेळी उपस्थित असलेले डॉ. अनिल शिंगे व डॉ. सौ. वैशाली जाधव यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले. अंगणवाडीमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी खुडे, पर्यवेक्षिका सौ. नाईक मॅडम, डॉ.शिंगे, डॉ. सौ. जाधव, सुमित शिंदे सर, वर्ये बिटमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)