राष्ट्रीय पोषण अभियान 2018ची सुरुवात प्रभात फेरीने

म्हसवड, दि. 1 (प्रतिनिधी) – माणदेशी तरंग वाहिनी, सामुदायिक रेडिओ केंद्र म्हसवडच्या वतीने पोषण अभियानाची सुरुवात दि. 1 रोजी सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली.

भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये पोषण अभियान सप्टेंबर 2018 कार्यक्रम राबविला जात आहे. भारतामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान अभियान विविध माध्यमांच्याद्वारे राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 रोजी सकाळी 8 वाजता म्हसवड येथील गुरुकुल विद्यामंदीरातील शालेय मुला-मुलींच्या सहभागातून म्हसवड शहरामधून जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये सहभागी झालेल्या मुला-मुलींच्या हातामध्ये पोषण अभियानाशी निगडित घोषवाक्‍यांचे फलक होते. त्याचबरोबर प्रभात फेरीतील सहभागी रिक्षाद्वारे पोषण अभियानाचे संदेश लोकांच्यासाठी प्रसारीत केले जात होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात घोषणा देत प्रभात फेरीमध्ये चैतन्य निर्माण केले. शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य सेवकांच्या वतीने पोषण आहार व स्वच्छता या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माणदेशी रेडिओच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ंप्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी श्रीश्री गुरुकूल विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, प्राथमिका आरोग्य केंद्रामधील आरोग्य सेवक आणि माणदेशी रेडिओ टिमने विशेष प्रयत्न घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)