राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटीलला 4 सुवर्ण पदके

कोल्हापूर – नवी दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप आणि ट्रायल क्रमांक पाचमध्ये अभिज्ञा पाटीलने सलग 4 सुवर्णपदके पटकावली आहेत. 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सीनियर गटात 600 पैकी 753 गुणांची कमाई करत हीना सिद्धू, हरिवीन सराव यासारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंना कडवी झुंज देत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

तसेच 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात योगिता व नयनी भारद्वाज यांच्यावर मात करुन 573 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. 10मीटर एयर पिस्टल प्रकारात ट्रायल पाचमध्ये ज्युनिअर गटात सुवर्णपदक, 25 मीटर .22 स्पोर्टस पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात 571 गुणांसोबत सुवर्णपदक पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिज्ञा पाटील ही कोल्हापूर जिल्हा क्रीडा प्रबोधनीची विद्यार्थिनी आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य माणिकराव वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तोसिफ सय्यद, संदीप तरटे, अजित पाटील, युवराज साळुंखे, जितेंद्र विभुते यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले या बरोबर आई-वडील प्रतिभा पाटील व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)