राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : काहीर, मानस, हर्ष, सोहा उपान्त्य फेरीत 

रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 

पुणे – सोहा सिंग हिने मुलींच्या गटात, तर काहीर वारिक, मानस धामणे या खेळाडूंनी मुलांच्या गटात मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवताना एमएसएलटीए आयोजित बाराव्या रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली.

मुंबईतील जी. ए. रानडे टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील 12 वर्षांखालील मुलींच्या उपान्त्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित श्रुती अहलावतने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दहाव्या मानांकित इरा शहाचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. तसेच तिसऱ्या मानांकित गुजरातच्या चांदणी श्रीनिवासनने तेलंगणाच्या सातव्या मानांकित रिधी पोकाचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मुलींच्या गटातील आणखी एका लढतीत कर्नाटकच्या पाचव्या मानांकित सोहा सिंगने तेलंगणाच्या चौथ्या मानांकित मलिष्का कुरामुला 4-6, 6-2, 6-3 असे पराभूत केले. दिल्लीच्या सहाव्या मानांकित तेजस्वी दबसने महाराष्ट्राच्या अस्मी आडकरवर 6-2, 6-2 असा विजय मिळवला.

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या काहीर वारिकने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत उत्तरप्रदेशच्या दुसऱ्या मानांकित ऋषील खोसलाचा 6-2, 6-2 असा पराभव करून दिमाखात उपान्त्य फेरीत धडक मारली. दिल्लीच्या तृतीय मानांकित हर्ष फोगटने आसामच्या मनन नाथचा 6-3, 6-0 असा सहज पराभव केला. तसेच महाराष्ट्राच्या मानस धामणेने बाराव्या मानांकित ओमांश सहारियावर 6-1, 6-2असा विजय मिळवला.

सविस्तर निकाल- 
बारा वर्षांखालील मुली एकेरी – उपान्त्यपूर्व फेरी- श्रुती अहलावत (हरियाणा-1) वि.वि. इरा शहा (महा-10) 6-3, 6-1; चांदणी श्रीनिवासन (गुजरात-3) वि.वि. रिधी पोका (तेलंगणा-7) 6-2, 6-3; सोहा सिंग (कर्नाटक-5)वि.वि. मलिष्का कुरामु (तेलंगणा) (4) 4-6, 6-2, 6-3; तेजस्वी दबस (दिल्ली-6) वि.वि. अस्मी आडकर (महा) 6-2, 6-2;

बारा वर्षांखालील मुले एकेरी – उपान्त्यपूर्व फेरी- रोहन अगरवाल (पश्‍चिम बंगाल-10) वि.वि. धर्शन गलीवेट (तेलंगणा) 6-1, 6-0; हर्ष फोगट (दिल्ली-3) वि.वि. मनन नाथ (आसाम) 6-3, 6-0; मानस धामणे (महा) वि.वि. ओमांश सहारिया (12) 6-1, 6-2; काहीर वारिक (महा) वि.वि. ऋषील खोसला (उत्तरप्रदेश-2) 6-2, 6-2;
बारा वर्षांखालील मुले दुहेरी – उपान्त्यपूर्व फेरी- हर्ष फोगट-ऋषील खोसला( 1) वि.वि. केवल किरपेकर-स्वरमन्यु सिंग (15) 6-0, 6-1; हर्ष राघव-देबाशिष साहू (3) वि.वि. ध्रुव सचदेवा-सिद्धांत शर्मा 6-2, 7-6(5); मानस धामणे-प्रणव रेथीन वि.वि. हजारिका जिग्यश्‍मान-मनन नाथ 6-2, 6-3; रोहन अगरवाल-वंश नांदल वि.वि. महालिंगम खंडेलवाल-काहीर वारिक 6-4, 6-1;

बारा वर्षांखालील मुली दुहेरी – उपान्त्यपूर्व फेरी- श्रुती अहलावत-मलिष्का कुरामु वि.वि. दुर्गांशी डी.-इकलारू राजू 6-2, 6-4; समीक्षा दबस-तेजस्वी दबस(5) वि.वि. रिद्धी पोका-ईरा शहा (3) 6-2, 6-1; निराली पदनिया-सौम्या रोंडे वि.वि. संजना देवीनेणी-हर्षिनी नागराजा 7-5, 6-4; सोहा सिंग-चांदणी श्रीनिवासन वि.वि. रिया सचदेवा-सौमित्रा वर्मा 6-3, 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)