राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : अस्मी आडकरचा द्वितीय मानांकित दुर्गांशीवर विजय 

रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 

पुणे – अस्मी आडकरने मुलींच्या गटात, तर रोहन अगरवाल, मनन नाथ, ओमांश सहारिया, काहीर वारिक यांनी मुलांच्या गटात मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवताना एमएसएलटीए आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. मुंबईतील जी. ए. रानडे टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील बारा वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या अस्मी आडकरने दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित दुर्गांशी डीचा 6-4, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तेलंगणाच्या सातव्या मानांकित रिधी पोकाने नवव्या मानांकित निराली पदनियाचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-2 असा पराभव केला. इरा शहाने सानिका भोगाडेचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या काहीर वारिकने कर्नाटकाच्या अकराव्या मानांकित जैसन डेव्हिडचा 6-1, 6-0 असा पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. आसामच्या मनन नाथने आठव्या मानांकित केशव गोयलचा 6-4, 6-4 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. पश्‍चिम बंगालच्या दहाव्या मानांकित रोहन अगरवाल याने सातव्या मानांकित पंजाबच्या देबाशिष साहूचा टायब्रेकमध्ये 7-6 (6), 6-2 असा पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल- 
बारा वर्षांखालील मुली एकेरी – उप-उपान्त्यपूर्व फेरी – श्रुती अहलावत (हरियाणा-1) वि.वि. आलिशा देवगावकर (महा) 6-3, 6- 1; इरा शहा (महा-10) वि.वि. सानिका भोगाडे (महा) 6-4, 6-3; चांदणी श्रीनिवासन (गुजरात-3) वि.वि. कायरा चेतनानी (महा-13) 6-2, 6-2; रिधी पोका (तेलंगणा-7) वि.वि.निराली पदनिया (तेलंगणा-9) 7-6 (1), 6-2; सोहा सिंग (कर्नाटक-5) वि.वि. लक्ष्मी बोगाला (आंध्रप्रदेश) 6-0, 7-5; मलिष्का कुरामु (तेलंगणा-4) वि.वि. स्वरा काटकर (महा) 6-2, 6-2; तेजस्वी दबस( दिल्ली-6) वि.वि. रिया सचदेवा (दिल्ली-12) 6-2, 6-0; अस्मी आडकर (महा) वि.वि. दुर्गांशी डी (दिल्ली-2) 6-4, 6-1;

बारा वर्षांखालील मुले एकेरी – उप-उपान्त्यपूर्व फेरी – धर्शन गलीवेट (तेलंगणा) वि.वि. ऋषी सादिशकुमार (तमिळनाडू) 6-1, 6-2; रोहन अगरवाल (पश्‍चिम बंगाल-10) वि.वि. देबाशिष साहू (पंजाब-7) 7-6 (6), 6-2; हर्ष फोगट (दिल्ली-3) वि.वि. अनिरुद्ध नल्लापराजू (तेलंगणा) 6-1, 6-1;मनन नाथ (आसाम) वि.वि.केशव गोयल (पश्‍चिम बंगाल-8) 6-4, 6-4; ओमांश सहारिया (12) वि.वि.राघव हर्ष (5) 6-3, 6-4; मानस धामणे (महा) वि.वि. अर्णव पापरकर (महा) 6-2, 6-1; काहीर वारिक (महा) वि.वि.जैसन डेव्हिड (कर्नाटक-11) 6-1, 6-0; ऋषील खोसला (उत्तरप्रदेश-2) वि.वि. जिग्यश्‍मान हजारिका (आसाम-15) 6-3, 7-6 (4);

मुले दुहेरी – पहिली फेरी- हर्ष फोगट-ऋषील खोसला (1) वि.वि. फतेह सिंग-प्रणव तनेजा 6-1, 6-2; केवल किरपेकर-स्वरमन्यु सिंग वि.वि.अर्णव पापरकर-ऋषिकेश अय्यर 7-6 (6), 6-2; हर्ष राघव-देबाशिष साहू (3) वि.वि. ध्रुव अगरवाल-हितेश चौहान 7-6(6), 6-4; ध्रुव सचदेवा-सिद्धांत शर्मा वि.वि. प्रणित भाटिया-श्री तम्मा 4-6, 6-3, 10-4; मानस धामणे-प्रणव रेथीन (4) वि.वि. विनीत मूत्याला-अनिरुद्ध नल्लापराजू 6-0, 7-6 (1);
मुली दुहेरी – पहिली फेरी- श्रुती अहलावत-मलिष्का कुरामु वि.वि. कायरा चेतनानी-शिवानी जी 6-1, 6-1; रिद्धी पोका-इरा शहा वि.वि. जेनिका जैसन-स्वरा काटकर 6-3, 6-2; समीक्षा दबस-तेजस्वी दबस वि.वि. तमन्ना सैनी-टीना शर्मा 6-2, 6-3; संजना देवीनेनी-हर्षिनी नागराज वि.वि. ह्रिती आहुजा-अलिशा देवगावकर 6-4, 4-6, 10-5; निराली पदनिया-सौम्या रोंडे (4) वि.वि. नियती कुकरेती-मैत्रेयी फोगट 6-2, 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)