राष्ट्रीय जंतनाशक मोहिम 10 पासून

पुणे – बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा मुलांना कमजोर करणारा आहे. कृमिदोष हा रक्‍तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच पण बालकांची बौध्दीक आणि शारिरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. यावर मात करण्यासाठी येत्या 10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्ह्यातील 16 लाख 37 हजार 661 मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मोहिमेच्या जनजागृतीसाठी सर्व शाळांमधून 8 ऑगस्ट रोजी प्रभातफेरी काढण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)