राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ‘वारणेचा वाघ’ दाखल

पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या “वारणेचा वाघ’ या कादंबरीवर आधारित “वारणेचा वाघ’ हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपटाच्या खजिन्यात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी या बाबतची माहिती दिली.

मगदुम म्हणाले, राष्ट्रीय चित्रपटाच्या संग्राहलयाला मिळालेल्या खजिन्यात 71 चित्रपट दाखल झाले आहेत. त्यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये “वारणेचा वाघ’, ग. दि. माडगुळकर यांची कथा,पटकथा आणि संवाद आसलेल्या “संत गोरा कुंभार’, प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा ‘केला इशारा जाता जाता’, त्याचबरोबर व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’,’चंदनाची चोळी, अंग अंग जाळी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’,”सुळावची पोळी’,”नवरी मिळे नवऱ्याला’,”गुलछडी’,”चंबू गबाळे’,”दे धडक बेधडक’,”प्रतिकार’ या मराठी चित्रपटांचा ठेवा संग्राहालयाला मिळाला आहे. या मराठी चित्रपटांबरोबरच 29 हिंदी चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे.

आशय फिल्म क्‍लबचे सतिश जकातदार म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य सर्वांना परिचित आहे. फकिरा, वारणेचा वाघ या साहित्यकृती लोकप्रिय झाल्याने त्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र, ते चित्रपट आतापर्यंत उपलब्ध नसल्याने रसिकांना त्याचा आस्वाद घेता आला नाही. आता “वारणेचा वाघ’ची 16 एमएम प्रिंट उपलब्ध झाल्याने रसिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)