राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची पंतप्रधान मोदींनी केली सुरुवात

मंडला (मध्य प्रदेश ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशच्या मंडला जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात केली. आज असणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचे औचित्य साधत या अभियानाची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराज चौहान उपस्थित होते.

यावेळी मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आपण स्वप्न साकार करणार आहोत, त्यासाठी देशातील जनतेचे राहणीमान उंचाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. तसेच आपण ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान बदलण्यासाठी जनप्रतिनिधीने चांगले काम करण्याचा संकल्प करावा, तसेच चांगल्या कामाची इच्छाशक्ती हे आपल्या कामाला आणखी मजबूत करतात असेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच त्यांनी आपण जनतेचे सेवक असून आपल्याला जनतेने त्यांच्या सेवेसाठीच निवडून दिले असल्याचेही म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)