राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पूर्व शिबिराला सुरुवात

पिंपरी, (प्रतिनिधी) – किशोर व किशोरी गटात 24 ते 28 मे दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेपूर्वी या दोन्ही राज्य संघांसाठी स्पर्धापूर्व सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‌घाटन झाले. यावेळी क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक समीर मासुळकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र सापटे, मुख्याध्यापक जयराम वायाळ, कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष शिवाजी येळवंडे, मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आनंद पवार, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे, संघव्यवस्थापक दीपक रावरे, ऋषीकेश वचकल, ऐश्‍वर्या साठे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर काळजे यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेकरिता निवड झालेले संघातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – किशोर गट – शुभम थोरात (कर्णधार), सौरभ अहिर, नागेश चोरलेकर, गणेश जाधव, साहिल चिखले, शुभम खळदकर, धीरज भावे, नरेंद्र कातकडे, चंदू चावरे, नमोज चौधरी, आदित्य धिमधिमे, रामजी कश्‍यप.

राखीव खेळाडू – अक्षय डाळे, कुणाल पाटील, साहील जाधव. किशोरी गट – साक्षी करे (कर्णधार), रुतिका राठोड, साक्षी वसावे, ऋतुजा सुराडकर, मयुरी पवार, रितिका मगदुम, वैभवी गायकवाड, गौरी शिंदे, साक्षी वाफेलकर, साक्षी सरजीने, वैष्णवी पालवे, अश्‍विनी निशाद. राखीव खेळाडू – सोजल जाधव, वेदिका शेळके, दीपाली सनगले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)