राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अक्षता वाळुंजची निवड

भोसरी – लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी अक्षता वाळुंज हिची शालेय राष्ट्रीयस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल प्रकारात अक्षता वाळुंज हिने पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करुन सुवर्ण पदक पटकाविले. 19 वर्षाखालील मुलींच्या गटात ही स्पर्धा झाली. त्यात तिने 53 किलो वजन गटात कोल्हापूर विभागातील रूपाली माने हिला 12-07 गुणांच्या फरकाने मात दिली.

-Ads-

याच कुस्ती स्पर्धेत राजमाता जिजाऊ विद्यालयाची श्रद्धा विकास भोर हिने 55 किलो वजनगटात द्वितीय तर सोनी सिध्दप्पा दुपाली हिने 59 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला. या शालेय राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर अशा 8 विभागातील खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला होता. त्यात अक्षता वाळुंज हिने पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व केले. सोनीपत येथे होणार असलेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विविध वजनगटासाठी महाराष्ट्राच्या संघातून अक्षता वाळुंज खेळणार आहे.

या विद्यार्थिनींना प्रा. गोपीचंद करंडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे, खजिनदार व नगरसेवक अजित गव्हाणे, संस्थेचे सचिव विश्वनाथ कोरडे, प्रतापराव खिरीड, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य प्रा. दादासाहेब पवार यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)