राष्ट्रीयकृत बॅकांमधील रिक्त जागा भरणार

नवी दिल्ली – सरकारने राष्ट्रीयकृत बॅंकांमधील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया हाती घेतली असून ही प्रक्रिया वेगाने राबवली जाईल अशी माहिती अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी राज्यसभेत दिली. बॅंकांमधील कामकाज पद्धतीला होत असलेल्या विलंबा मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असून उमेदवारांच्या मुलाखतींचीही प्रक्रिया पुर्ण झाली आहे अशी माहिती गोयल यांनी दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासात या विषयीचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता त्यावेळी गोयल बोलत होते. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या प्रमुखांच्या नियुक्‍त्यांची प्रक्रियाही अत्यंत पारदर्शीपणे राबवली जात आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की या आधी बॅंकांचे संचालक किंवा प्रमुखांच्या नियुक्‍त्या मनमानी पदधतीने होत असत आता मात्र तसे होत नाही.

-Ads-

भरती प्रकियेबाबत बॅंकांना सरकारने पुर्ण स्वायत्तता दिली असून त्या प्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करीत नाही असे ते म्हणाले. बॅंकांच्या बुडीत कर्जावरील व्याजाच्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की बुडीत कर्ज व्याजासह वसुल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)