राष्ट्रीयकृत बॅंकांकडून जिल्हा बॅंकेचे धनादेश स्विकारण्यास असमर्थता

संदेश कार्ले ःशासकीय योजनांच्या लाभार्थींचे नुकसान
नगर – नव्या सीजीएस क्‍लइरिंग सिस्टीमच्या अभावी राष्ट्रीयकृत बॅंकांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे धनादेश स्विकारणे बंद केले आहे. त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या लाभार्थींना बसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितींचे खाते जिल्हा बॅंकेच्या विविध शाखांमध्ये आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांची रक्कम जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत धनादेशाव्दारे लाभार्थींना दिली जाते. मात्र सदर मदतीचे धनादेश जिल्हा बॅंकेचे असल्याने राष्ट्रीयकृत बॅंका ते स्विकारत नसून लाभार्थींची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा बॅंकेने आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.
याबाबत कार्ले यांनी जिल्हा बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक रावसाहेब कर्पे यांना निवेदन दिले. यावेळी पं.स.सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, प्रविण कोठुळे, सतिश काळे, सुभाष निमसे, संतोष बहिरट, भाऊ बहिरट, अनिल कोठुळे, बाळू कोठुळे, हेमंत कोठुळे आदी उपस्थित होते. कार्ले यांनी या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीयकृत बॅंकांनी जिल्हा बॅंकेचे धनादेश स्विकारण्यास नकार दिला आहे.
एकट्या नगर तालुका पंचायत समितीतील सुमारे 300 लाभार्थींचे 18 ते 19 लाख रुपये या निर्णयामुळे मिळू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील सुमारे 3 हजार लाभार्थींचे सुमारे दोन कोटी रुपये सीजीएस क्‍लइरिंग सिस्टीममुळे अडकले आहेत. जिल्हा बॅंकेने या गोष्टीची आधीच पूर्तता न केल्याने लाभार्थींना नाहक फटका बसत आहे. जिल्हा बॅंकेने ऑनलाईन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. परंतु, आता सीजीएस क्‍लइरिंग सिस्टीमअभावी या बॅंकेचे धनादेश राष्ट्रीयकृत बॅंका स्विकारत नाहीत. ही त्रुटी तातडीने दूर करावी अन्यथा लाभार्थींसह जिल्हा बॅंकेत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)