राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प नैतिक दृष्ट्या अयोग्य…

माजी एफबीआय संचालक

वॉशिंग्टन (अमेरिका) – राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प नैतिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी म्हटले आहे. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प हे मानसिक दृष्ट्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र असल्याच्या सुरुवातीच्या काळात केल्या गेलेल्या आरोपांबाबत बोलत नाही, वा त्यांच्या मनोभ्रमाबाबतही बोलत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ते राष्ट्राधय्क्षपदासाठी अयोग्य आहेत असे मला म्हणायचे नाही, तर ते नैतिक दृष्टीने या पदासाठी अयोग्य आहेत असे मला सांगायचे आहे.

आपल्या राष्ट्राची जी मूलभूत मूल्ये आहेत, त्यांच्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी आदर दाखावायला पाहिजे. त्या मूल्यांचे पालन केले पाहिजे. या मूल्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे सत्य. आणि राष्ट्राध्यक्ष सत्याबाबत आदर दाखवण्यास, त्याचे पालन करण्यास सक्षम नाहीत. सत्याचे पालन ते करत नाहीत असे जेम्स कोनी यांनी म्हटले आहे. .
सन 2016 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रचार अभियानात रशियाच्या हस्तक्षेपाबद्दल चाललेल्या तपासाच्या संदर्भात ट्रम्प यांनी जेम्स कोमी यांना मे 2017 मध्ये पदावरून काढून टाकले होते.
हिलरी क्‍लिंटन परराष्ट्र मंत्री असतानाच्या ई-मेल सर्व्हरच्या संभावित दुरुपयोगाबद्दल एफबीआय पुन्हा एकदा तपास करणार आहे, अशी निवडंणुकीच्या बरोबर 11 दिवस अगोदर जेम्स कोमी यांनी घोषणा केली होती. हेच आपल्या पराभवचे कारण असल्याचे हिलरी क्‍लिंटन यांनी म्हटलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)