राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने श्रीरामपूर आगाराला निवेदन

श्रीरामपूर- विद्यार्थ्यांचे मासिक पास तसेच विनाथांबा एसटीच्या तिकीटसाठी महिलांना होणाऱ्या त्रासबाबत येथील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांना निवेदन देण्यात आले.

उन्हाळ्याची सुटी संपून नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे बसस्थानकावर एसटीने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मासिक पास काढण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र येथील आगारात एसटी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पास काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागत आहेत. तसेच विना थांबा गाडीचे तिकीट घेण्यासाठी महिलांना दोन दोन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करुन विद्यार्थ्यांना तात्काळ पास उपलब्ध करुन द्यावेत तसेच महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उघडण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल रविंद्र सानप यांच्या हस्ते निवेदन स्विकारून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन शिवदे यांनी दिले. यावेळी विद्यार्थी शहर अध्यक्ष निरंजन भोसले, तालुका उपाध्यक्ष हर्षल दांगट, सोहेल शेख, सागर वाडीले, आकाश जाधव, शुभम परदेशी, अवधूत गाडे, भारत शिवदे, पंकज जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)