राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्षपदी रणसिंग

कुरवली- पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्षपदी निमसाखर (ता. इंदापूर) येथील विरसिंह विश्‍वासराव रणसिंग यांची निवड झाली आहे. विरसिंह रणसिंग यांनी यापूर्वी युवक जिल्हा सरचिटणीसपदी पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य व युवक संघटन केल्याने त्या या कार्याची दखल घेत पक्ष अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, युवक जिल्हा अध्यक्ष पै सचिन घोटकुले यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधत त्यांना दिली आहे. निवडीनंतर ते म्हणाले की, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून युवक संघटनेचा अधिक अधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या नेतृत्वाबद्दल जो विश्‍वास दाखवला आहे त्या विश्‍वासाचे सार्थक करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक व तरुण वर्ग यांना एकत्रीकरण करून चांगल्या कामाचे विचाराचे व पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. गावोगावी असणाऱ्या राष्ट्रवादी शाखांमधील तरुणांना व त्यांच्या विचारांना पक्षाच्या माध्यमातून बळकट करण्यात येईल. पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)