राष्ट्रवादी युवक गटाला खिंडार

मदनवाडीत देवकाते भाजपामध्ये : निवडणुकीच्या तोंडावर भरणे गटाला धक्‍का

भिगवण- भिगवण हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला मानला जात होता. पण इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तेजस देवकाते यांनी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून आगमी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंगेसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे.
तेजस देवकाते हे राष्ट्रवादी युवकमध्ये सक्रीय होते. तालुक्‍यामध्ये युवकांची भक्‍कम फळी त्यांनी तयार केलेली होती. पंरतू तालुक्‍यातील सत्ताधारी यांनी सातत्याने तरूणांच्या रोजगारासंदर्भात केलेले दुर्लक्ष, प्रामाणिक कार्यकर्ते यांना न्याय न देता विरोधकांच्या हिताचे निर्णय घेणे तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिंकांना नोकरीसंबंधी उद्योग व्यवसायाच्या कोणत्याही संधी उपलब्ध करून न देणे, त्याचबरोबर मदनवाडी तलावात पाणी सोडून ते भरून देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना न करणे या सर्व कारणांमुळे देवकाते यांनी वेळोवेळी तालुक्‍यातील नेत्यांकडे मागणी करूनही युवक पदाधिकारी यांना सातत्याने डावलल्याने पक्षामध्ये कार्यरत असताना युवक तालुकाध्यक्ष पदावर निवड करताना संधी न दिल्याने देवकाते यांनी पक्षामध्ये जाहीर बंड केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी युवक अध्यक्षपद बदलावे लागले होते. त्यामुळे तेव्हापासुनच राष्ट्रवादी युवकमध्ये असंतोष खदखदत होता. तो यानिमित्ताने बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
देवकाते हे मदनवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायच सदस्यपदी कार्यरत आहेत. त्यामुळे गावासाठी वरदान ठरणारा मदनवाडी तलाव भरून द्यावा, अशी मागणी त्यांनी सातत्याने लाऊन धरली होती. परंतू वरिष्ठांनी नेहमीच दुर्लक्ष केले. या सर्व गोष्टीमुळे नाराज होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सत्ताधारी भाजपने राबिवलेल्या अनेक निर्णयांमुळे प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. यापुढे तालुक्‍यात भाजपची पाळेमुळे रूजवणे पक्ष वाढवणे व स्थानिक तरूणांच्या हातांना औद्योगिक वसाहतीमंध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर तलावात पाणी सोडण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुक्‍यातील अनेक तरूणांनी त्यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक शीतल शिंदे, राघवेंद्र मानकर, बाळासाहेब गावडे, माऊली चवरे, मारूती वणवे, वासुदेव काळे, अशोक वणवे, नाना सातव, दिनेश मारणे, शाम मारणे, अजय तांबट, प्रमोद ननवरे, पुणे शहर व इंदापूर तालुक्‍यातील भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)