राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा सासवडला युवा आक्रोश मोर्चा

सासवड- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी सासवड तहसील कार्यालावर युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील शिवतिर्थावरुन मोर्चास सुरवात झाली. यामध्ये मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुरंदर तालुक्‍यातील भीषण दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासन गाफील असून सरकारकडे दुष्काळीचे खोटे अहवाल आणि माहिती पाठवली जात आहे. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांचा मतदारसंघच भीषण दुष्काळाच्या झळा सोसत आहे. मात्र, राज्यमंत्री पुरंदकरांना केवळ आश्वासनांची खैरात वाटत आहेत. तालुक्‍यात शंभर टक्‍के दुष्काळ जाहीर केला जाणे आवश्‍यक असताना प्रशासन मंत्र्यांच्या दबावामुळे शासनाकडे खोटी माहिती सादर करीत आहेत. तालुक्‍यात जनावरांच्या चारा छावण्या त्वरित चालू करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जालिंदर कामठे, शिवाजी पोमण, पुष्कराज जाधव, बाळासाहेब भिंताडे, राहुल गिरमे, सचिन घोटकुळे, धनंजय भोईटे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)