राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन घोटकुले

तळेगाव दाभाडे : सचिन घोटकुले यांच्या निवडीबद्दल सत्कार करताना बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, अंकुश आंबेकर, संतोष भेगडे.

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य व गटनेता सचिन आनंदराव घोटकुले यांची निवड करण्यात आली. मावळ तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते उपस्थित होते. पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष संतोष भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस सुनील दाभाडे, सरपंच दत्तात्रय पडवळ, बाळासाहेब घारे, संतोष मुऱ्हे, सुदाम कदम, तुषार भेगडे, संजय शेडगे, अशोक साठे, संदीप साठे, संदीप लांडगे, नितेश वाघमारे, प्रताप घोटकुले कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले की, घोटकुले यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ असल्याने युवकाचे संघटन मजबूत करुन युवक संघटनेला नवचैतन्य निर्माण करेन. जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर म्हणाले, सचिन घोटकुले यांचे कार्य सामाजिक, क्रीडा क्षेत्रात असून प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. युवक संघटनेला अष्टपैलू नेतृत्व मिळाले. घोटकुले यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी सत्कार केला.

सत्काराप्रसंगी घोटकुले म्हणाले की, युवक संघटनेतून नेतृत्व उदयास येते. जिल्ह्यातील युवकांचे संघटन मजबूत करुन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढऊ. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करू. नगरसेवक संतोष भेगडे यांनी प्रास्ताविक केले. सुदाम कदम यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)