राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलच्या तालुका अध्यक्षपदी डॉ. रंधवे

राजेगाव- राजेगाव (ता. दौंड) येथील डॉ. प्रमोद कांतिलाल रंधवे यांची नुकतीच दौंड तालुका राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडीचे पत्र राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवदीप उंद्रे यांनी दिले. अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत आणि परिसरातील गरीब व गरजूंना आरोग्यसेवेसाठी मोलाचे सहकार्य करीत असतात, तसेच अनेधविध उपक्रम राबवत असतात. यामध्ये रक्तदान, वृक्ष लागवड, तसेच आरोग्याची अनेक शिबिरे, समाजोपयोगी उपक्रम ते राबवत असतात. तालुक्‍यातील रंधवे यांचे सामाजिक, राजकीय कार्य पाहता त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी रंधवे म्हणाले की, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, डॉक्‍टर सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवदीप उंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात पक्ष संघटन आणि प्रत्येक गावात विकासकाम, तसेच गरजूंना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)