राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्षाची निवड अधिवेशनानंतर?

23-24 जूनदरम्यान बालेवाडीत कार्यक्रम 

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनाच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर पुणे शहराध्यक्षांची निवड जाहीर होईल, असे वाटले होते. मात्र, 23 आणि 24 जूनच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतरच 30 जूनदरम्यान ही निवड जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यक्रम घेतला. यानंतर शहराध्यक्षपदाची निवड होईल, अशी चर्चा होती. मात्र, आता पुन्हा एकदा हा विषय लांबणीवर पडला असून दि. 30 जूनदरम्यान शहराध्यक्षपदाची निवड जाहीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड झाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अधिवेशन घ्यावे लागणार आहे. हे अधिवेशन 23 आणि 24 जून दरम्यान पुण्यात बालेवाडी येथे होणार आहे. या अधिवेशनाला देशभरातून निवडक एक हजार पक्ष प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनादरम्यान विविध ठरावांबरोबरच पक्षांतर्गत सोशल मीडिया हा विषय मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रतिनिधींना त्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

पुण्यातून शहराध्यक्षपदासाठी प्रशांत जगताप, दीपक मानकर, सुभास जगताप यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघामध्ये स्वारस्य दाखवल्याने जगताप आणि मानकर हे आता रेसमध्ये आहेत. या दोघांमधील एकाला किंवा पक्षश्रेष्ठी सांगतील त्या कार्यकर्त्याच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडणार आहे. 30 जूनपर्यंत याची उत्सुकता ताणून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)