राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत निवडणूक

शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

पुणे – राज्यसभेच्या खासदारपदी पुन:श्‍च निवड झाल्यानंतर ऍड. वंदना चव्हाण यांच्याकडील शहराध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्या नेतृत्त्वाकडे सोपवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी याआधीच संकेत दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला असून, त्याबाबत येत्या 15 दिवसांत निर्णय होणार आहे.

-Ads-

या पदासाठी पक्षातील आजी-माजी नगरसेवकांसह 16 जण इच्छुक आहेत. येत्या 22 एप्रिलला शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराध्यपदी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता पक्ष संघटनेत आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम पक्षाने जाहीर केला आहे.

दरम्यान, पुण्यासह अन्य शहरांमधील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा नेते अजित पवार यांना देण्यात यईल, अशी शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. चव्हाण यांच्याकडे गेली 9 वर्षे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यात, त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यामुळे शहराध्यक्ष बदलाची चर्चा पक्षात सुरू आहे. या पदावर नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे पवार यांनी आधीच जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर नेतृत्त्वाने शहराधयक्षपदासाठी इच्छुकांची नावे मागवली होती. त्यानुसार प्रदेश समितीकडे नावांची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 22 एप्रिलला होईल. त्यानंतर येत्या 29 एप्रिलला राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)