राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभागाकडुन निबंध स्पर्धेचे आयोजन

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मला भावलेले महात्मा फुले या विषयावर 5वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अमित खामकर यांनी दिली आहे.

निबंध सुवाच्च अक्षरात व शंभर ओळीपर्यंत लिहीलेला असणे आवश्‍यक असून या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व सहभाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून 20जुलै च्या आत विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे दयावेत. व शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)