राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन

पुणे – स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो सरळ मार्गे व्हावी तसेच सत्ताधारी भाजपच्या मेट्रो मार्गांवर होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बदलण्यात आलेल्या मार्गाचा निषेध करत सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात आली. या विस्तारीत मार्गाला महापालिकेने मान्यता दिलेली आहे. त्याचा डीपीआर अंतिम करण्याचे काम सुरू असून हा मार्ग सरळ झाला तरच त्याचा उपयोग होणार आहे. मात्र, या मार्गात सत्ताधारी भाजपकडून हस्तक्षेप करून तो वळविला जात आहे. त्यामुळे “मेट्रो ही पुण्याची आहे, भाजपची नाही’ अशी टीका यावेळी करण्यात आली.

शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे, संतोष नागरे, नितीन कदम, दिलीप अरुनदेकर, आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)