राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 31 प्रवक्‍त्यांची यादी जाहिर

8 नवीन चेहऱ्यांना संधी
मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीची राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षांची बाजू जोरदारपणे मांडण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात आपल्या 31 प्रवक्‍त्याची फौज तयार केली आहे. या प्रवक्‍त्यांमध्ये 8 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज 31 प्रवक्‍त्यांची यादी जाहिर केली. या प्रवक्ता यादीमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून नवाब मलिक आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण, संजय खोडके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

-Ads-

या यादीमध्ये जिल्हानिहाय प्रदेश प्रवक्ते जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई – आमदार विद्या चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, क्‍लाईड क्रास्टो, अदिती नलावडे, महेश चव्हाण, डॉ.समीर दलवाई, पुणे – अंकुश काकडे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, विजय कोलते, भूषण राऊत, ठाणे – आनंद परांजपे, महेश तपासे, औरंगाबाद – सुरजितसिंग खुंगर, निलेश राऊत, उमर फारुकी, अकोला – डॉ. आशाताई मिरगे, नाशिक – विश्वास ठाकूर, डॉ. भारती पवार, बीड – उषाताई दराडे, अमरसिंह पंडीत, उस्मानाबाद – कुमारी सक्षणा सलगर, सोलापूर – उमेश पाटील, नागपूर – प्रविण कुंटे-पाटील आदी तर प्रवक्ता समन्वयक म्हणून सुरज चव्हाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
64 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)