राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 11 नगरसेवकांवर गुन्हा

– अधिकाऱ्यांची “कार्यालय कोंडी’, आंदोलन पडले महागात

पिंपरी – शहरातील विविध भागातील विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकत अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले होते. याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या अकरा आजी व एक माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक वणवे यांनी फिर्याद दिली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक समीर मासुळकर, मयूर कलाटे, जावेद शेख, मोरेश्‍वर भोंडवे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, वैशाली काळभोर, गीता मंचरकर, सुलक्षणा शिलवंत-धर, पौर्णिमा सोनवणे, तसेच माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या आवारात विना परवाना जमाव गोळा करुन आंदोलन करणे, अधिकाऱ्यांना कोंडणे, आर्वाच्य घोषणा देणे याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अनेक भागात विस्कळीत त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा होतो.

याबाबत वारंवार केलेल्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागात पाणी पुरवठा खंडीत करतात, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील पाणी पुरवठा विभागाला टाळे ठोकले होते. त्यानंतर कार्यालयाबाहेर ठाण मांडत महापालिका आयुक्त आल्या शिवाय टाळे न उघडण्याची भूमिका घेतली. अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर याठिकाणी आल्यानंतर एक तासानंतर पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची सुटका झाली. अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे आंदोलन राष्ट्रवादीवरच उलटल्याची चर्चा रंगली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)