राष्ट्रवादी कॉंग्रेसची बूथ स्तरावर मोर्चेबांधणी

80 टक्‍के काम पूर्ण : कमिटी प्रमुखांचे प्रशिक्षण शिबिर

पुणे – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुथ स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बुध कमिटी तयार केली असून, त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. या बुथ कमिटी प्रमुखांचे प्रशिक्षण शिबिर पक्षाने घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने 5 आणि 6 जानेवारी रोजी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांच्या प्रमुखांचे प्रशिक्षण शिबिर घेतले.

गेल्या दोन महिन्यांपासून कमिटी तयार करण्याचे काम पक्षातर्फे सुरू होते. बुथ प्रमुखांना कशाप्रकारे काम करायचे याचे प्रशिक्षण या शिबीरामध्ये देण्यात आले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुथनिहाय संपर्क यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या माध्यमातून तळागाळातील घटकांपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार पोहचवण्याचे काम होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि बुथ प्रमुख आधिक जोमाने काम करतील. यासाठी पक्षाचे राज्याचे आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील यांनी बुथ प्रमुखांना प्रशिक्षण दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रदेश चे सर्व निरीक्षक, आठही विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मतदारसंघांचे निरीक्षक, सर्व सेलचे प्रमुख पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)