राष्ट्रवादीवर दबावतंत्र; कॉंग्रेस लोकसभेसाठी सज्ज 

तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीत घेतला मतदारसंघनिहाय आढावा 

चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये संताप 
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह व कॉंग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता संपूर्ण महाराष्ट्र कॉंग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार येईल असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

मुंबई: लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ‘फिफ्टी- फिफ्टि’चा असलेला आग्रह… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा… या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसनेही तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीत राज्यातील सर्व मतदारसंघातील राजकिय परिस्थितीचा आढावा घेत लोकसभा निवडणूकीसाठी आम्हीही सज्ज आहोत, असा सावधानतेचा इशारा देत या निडणूकीत कॉंग्रेसचेच सरकार येणार, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

-Ads-

मागच्या चुकांची पुनरावत्ती न करता भाजपाचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने जागावाटपांची चर्चाही सुरू झाली. राष्ट्रवादीने 48 जागांपैकी “फिफ्टी- फिफ्टि’चा प्रस्ताव ठेवला. परंतु हा प्रस्ताव कॉंग्रेसला मान्य नाही. दोन्ही पक्षांकडून काही जागा अदला-बदली करण्याची मागणी आहे. पण त्यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यातच शरद पवार यांनीही राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत निवडणूकीची तयारी पूर्ण केली होती. त्यामुळे कॉंग्रेसनेही राजकिय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी जोरबैठका सुरू केल्या.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 15, 16 व 17 नोव्हेंबर रोजी प्रदेश कॉंग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून संपूर्ण ताकदीनिशी कॉंग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज आहे, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)