राष्ट्रवादीला उभारी देणाऱ्या शेखर गोरेंचा नेतृत्वाला विसर

कार्यक्रमालाही बोलावे जात नसल्याचे कार्यकर्त्यांना खंत

बिजवडी, दि. 6 (वार्ताहर) – माण तालुक्‍यात आ. जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादीला उतरती कळा लागली होती. परंतु, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळाली. आ. जयकुमार गोरेंशी टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने ही खेळी खेळली. मात्र, आता शेखर गोरेंचा पक्षाला विसर पडल्याचे दिसत आहे. कार्यक्रमाला साधे निमंत्रणही दिले जात नसल्याची खंत सौ. सुरेखा पखाले यांनी व्यक्त केल्यानंतर याबाबतची चर्चाही माण तालुक्‍यात सुरू आहे.
माजी आमदार पोळ यांच्या निधनानंतर माण तालुक्‍यात राष्ट्रवादी संपतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पक्षश्रेष्टींनी शेखर गोरे यांना पक्षात घेत माण तालुक्‍याचे नेतृत्व सोपवले. त्यांनीही स्वकर्तृत्व पणाला लावत पक्षाला उभारी देत विविध सत्तास्थाने मिळवून दिली. तरीही नेतेमंडळींनी त्यांना मनापासून स्विकारलेले दिसले नाही. याचेच उदाहरण म्हणजे अनेक कार्यक्रम, मेळावे त्यांना कोणतीही कल्पना न देता होत आहेत.
जिल्हा बॅंकेच्या निवडणूक व विधान परिषद निवडडणुकीत शेखर गोरेंनी राष्ट्रवादीसाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावली. यात राष्ट्रवादीच्या बाजूने मताधिक्‍य असतानाही पक्षातीलच काहींनी दगाफटका केला होता व पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, खचून न जाता नव्या जोमाने त्यांनी म्हसवड नगरपालिका व जि.प.पं.स.निवडणूकांत पक्षाला उज्वल यश मिळवून दिले. तरीही पक्षातील वरिष्ठ व तालुक्‍यातील नेतेमंडळींना त्यांचे महत्व पटल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच त्यांना पक्षाचे जिल्हास्तरीय व इतर कार्यक्रमांना निमंत्रित केले जात नाहीत. अनेकदा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या फ्लेक्‍सवरही त्यांचे फोटोही टाकले जात नाहीत.
दरम्यान, अकलूज येथे माण तालुक्‍यात विविध विकासकामांची पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माण तालुक्‍यातील सर्व नेतेमंडळींची उपस्थिती होती. मात्र पक्षाने ज्यांच्याकडे नेतृत्व सोपवले आहे ते शेखर अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील कामे पाहणाऱ्या त्यांच्या भगिनी सौ. सुरेखा पखाले याही दिसून आल्या नाहीत. याबाबत विचारले असता त्यांनी निमंत्रण नसल्याचे सांगत आम्हाला डावलले जात असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळींच्या ओठात एक अन पोटात एक अशी मानसिकता आहे. पण कोणी कितीही नाटके केली तरी शेखर गोरे माणची जनता शेखर गोरेंच्या बाजूने आहे, हे विधासभेत दिसेलच, असे त्यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांनी सांगितले.

 खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनाही विसर…

माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील थोड्याफार फरकाने निवडून आले. आजही ते भर कार्यक्रमात मी माणच्या लीडमुळे दिल्लीत गेल्याचे सांगतात. परंतु, हे लीड मिळण्यात शेखर गोरेंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र निवडून आल्यावर मोहिते-पाटीलांनी त्यांना कधीही विकासकामांच्या निधीसाठी, फंडासाठी कधी विचारले नाही. साधे धन्यवादही ते म्हणू शकले नाहीत, अशी खंत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)