राष्ट्रवादीने आ.प्रकाश गजभियेंची पक्षातून हकालपट्टी करावी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा आंदोलनाचा इशारा

वाई – राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून सार्वजनिक ठिकाणी ना. रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करण्याचा प्रकार करून तमाम शिवभक्तांचा घोर अपमान तर केलाच आहे. पण जे छत्रपती शिवाजी महाराज औरंग्यासमोर त्याच्या दरबारात देखील झुकले नाहीत, अशा छत्रपतींची वेशभूषा करून एका व्यक्तीपुढे सार्वजनिक ठिकाणी झुकून मुजरा करण्याचा लाजीरवाणा प्रकार गजभिये याने केला आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या आमदार गजभिये यांचा राष्ट्रवादी पक्षाने त्वरित आमदार पदाचा राजीनामा घेवून पक्षातून त्याची हकालपट्टी करावी.

या घटनेचा निषेध म्हणून वाईतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तमाम मावळ्यांनी वाईच्या किसनवीर चौकात निदर्शने करीत आमदार गजभिये यांच्याविरुध्द कारवाई करण्यासाठी आंदोलन करीत घोषणाबाजी केली. व तशा आशयाचे लेखी निवेदन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना दिले.

निवेदनात असेही म्हटले आहे, आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहोत. तात्काळ या घटनेची दाखल घेवून हिंदुंच्या आराध्य दैवताचा अपमान करणाऱ्या आमदार प्रकाश गजभिये यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून खटला दाखल करावा. तसेच त्या आमदाराला महाराष्ट्र बंदी करावी.

अन्यथा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त तो दिसेल तिथे आपल्या पद्धतीने शिक्षा करेल व उद्या वेळप्रसंगी त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी पाठीमागे हटणार नाही, रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी. निवेदनावर काशिनाथ शेलार, संदीप जायगुडे, संतोष काळे, संदीप साळुंखे, अश्‍विन भिंताडे, दिनेश खैरे, मुकुंद पोळ, विशाल गुजर, आनंद भुरसे, अक्षय अंबिके, सचिन खरात, यांच्या सह शेकडो शिवभक्तांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)