राष्ट्रवादीत मतभेदाची ठिणगी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती व “स्मार्ट सिटी’ अंतर्गत महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दिल्ली दौरा उरकला आहे. मात्र, या दौऱ्यावर नगरसेवक मयूर कलाटे यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या या दौऱ्यात सहभाग असल्याने कलाटे यांच्या टीकेमुळे राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. याशिवाय स्थायी समितीमध्ये मंजुर झालेल्या 350 कोटींच्या कचरा उचलण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या स्थायी सदस्या गीता मंचरकर यांनीच विरोध केला अन्य दोन नगरसेवकांची चुप्पीमुळे वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सत्ताधारी भाजपमधील वादाचा फायदा न घेतल्याची टीका तत्कालीन विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यावर होत होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी बदलाची राष्ट्रवादीतूनच जोर धरत होती. अशावेळी चिखलीगावचे दत्ता साने यांचे नाव वाकड गावचे मयूर कलाटे यांनी उचलून धरले होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांना संधी दिली. त्यानंतर भाजपला अडचणीत पकडण्याची एकही संधी साने यांनी सोडली नाही.
आता मात्र राष्ट्रवादीतच वाद पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महापालिकेने आयोजित केलेल्या दौऱ्यात दत्ता साने यांचा सहभाग असताना देखील दौरे काढण्यापेक्षा नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा देण्यावर भर द्यावा, अशी मागणी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे. स्वपक्षीय वरिष्ठ नेत्याच्या सहभागानंतरही कलाटे यांच्या या दौऱ्यावरील टीकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-Ads-

दत्ता साने हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच, स्थायी समिती बैठकीत कचरा उचलण्याच्या ऐनवेळच्या 350 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. स्थायीत राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर व राजू मिसाळ यांच्यापैकी केवळ मंचरकर यांनी या प्रस्तावाला विरोध केला. विशेष म्हणजे या प्रस्तावाच्या विरोधात राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. मंचरकर यांचा विरोध नोंदवून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असला, तरीदेखील अन्य दोन सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध न केल्याने राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दिल्ली दौऱ्यावरून परतलेले दत्ता साने या दोन्ही घटनांबाबत कोणती भुमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)