राष्ट्रवादीतर्फे 15 व 16 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने 15 व 16 फेब्रुवारीदरम्यान दोन दिवस जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अनागोंदी व जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. यावेळी घुले यांनी आंदोलनाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस घुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषाताई गुंड, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, समाजकल्याण सभापती उमेश परहर, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे, राहुरी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे, विठ्ठलराव लंघे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अख्तर शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, शहर महिला जिल्हाध्यक्ष रेश्‍माताई आठरे, निर्मलाताई मालपाणी, युवक प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, संदीप वर्पे, सोमनाथ धूत, किसनराव लोटके, पतिंगराव शेळके, दादासाहेब पठारे, दादा दरेकर उपस्थित होते.
घुले म्हणाले, “”गेल्या 3 वर्षांपासून सत्तेवर असलेले केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्याच्या जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाचे घटलेले दर, इंधनाची दरवाढ व गॅसचे दरवाढ, तसेच केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जी.एस.टी.च्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याची केंद्र व राज्य सरकारला जाणीव करून द्यावी, या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “हल्लाबोल आंदोलन’ हाती घेण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)