राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांना नोटिसा

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासह प्रदेश व जिल्हा नेतृत्वाने शिवसेना व भाजप या जातीयवादी शक्‍तींबरोबर न जाण्याचे आदेश देवून ते धुडकावून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिली . केवळ पाठिंबा देवून थांबले नाही तर भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान देखील केल्याने राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांना थेट प्रदेशकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या सर्व नगरसेवकांना आजच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसात खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे. या नगरसेवकांचा खुलासा आल्यानंतर स्थानिक नेतृत्वावर पक्षाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे फाळके यांनी स्पष्ट केले. यावेळी युवकचे प्रदेश सदस्य किरण काळे, सबाजी गायकवाड उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर पक्ष लक्ष ठेवून होता. त्यानुसार नगर शहरातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्व असलेल्या आमदार अरूण जगताप व आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रीय नेतृत्व करणारे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप या जातीयवादी शक्‍तींबरोबर न जाण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतू स्थानिक नेतृत्वाने नगरसेवकांना तशी कल्पना दिली होती की नाही हे माहिती नाही. त्यामुळे थेट स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरण्यापूर्वी नगरसेवकांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या नगरसेवकांनी कोणाच्या सांगण्यावरून भाजपला मतदान केले. हे कळण्यासाठी नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पक्षाने येथील स्थानिक नेतृत्वाला पक्षाचे समिकरण जुळत नसेल तर निवडणूक प्रक्रियेत अलिप्त राहण्याचे सुचविले होते. तसेच शिवसेना व भाजपमधील वादाचा फायदा घेण्याचे सुचविले होते. भाजप-शिवसेनेचे समिकरण जुळणार नसेल तर राष्ट्रवादीचा महापौर करा पण हे करतांना भाजपचा सभागृहात गैहजर राहून पाठिंबा मिळवा. अन्यथा पूर्णपणे शांत रहा असे सुचविले होते. परंतू यापैकी काहीच न करता पक्षाने दिलेला आदेश धुडकावून भाजपला पाठिंबा दिला आहे.

या सर्व प्रक्रियेबाबत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना बोलण्याचे सांगण्यात आले होते. परंतू ते बोलण्यास तयार नसल्याने ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून या नगरसेवकांच्या कारवाईबाबत मला बोलावे लागत असल्याचे फाळके यांनी स्पष्ट केले.

लोकसभा उमेदवार पवार ठरवतील
अहमदनगर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी राहणार आहे. पक्षाने मध्यतंरी आमदार अरूण जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब केले होते. परंतू महापालिकेत आज झालेल्या घडामोडींमुळे आ. जगताप यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत आता शरद पवार निर्माण घेतील असे यावेळी फाळके म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)