राष्ट्रवादीच्या सेल्फीला भाजपचे रांगोळी काढून उत्तर

साताऱ्यातील खड्डयांना घातली रांगोळी
सातारा- राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीने “खड्डे वुईथ सेल्फी’ आंदोलन पुकारल्यानंतर आता भाजपने साताऱ्यात खड्डयांना रांगोळी काढून प्रत्युत्तर दिले आहे.

साताऱ्यातील सदर बझार परिसरातील सैनिक नगर व मोना स्कुल मार्गावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे पादचारी तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. खड्डे तात्काळ भरावेत अशी मागणी देखील पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.मात्र, पालिकेककडून कोणत्या ही प्रकारचे पाऊल उचलण्यात येत नसल्याने अखेर भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खड्डयांना रांगोळी घालून पालिकेचा निषेध केला. यावेळी अमित भिसे, मनोज बाबर, स्वप्नील यादव, मयूर शिंदे, रोहन कांबळे, विक्रांत भोसले, स्वाती भोरे, छाया साळुंखे आदी. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-

 आंदोलनाची साताऱ्यात चांगलीच चर्चा
राष्ट्रवादीने व प्रामुख्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात “खड्डे वुईथ सेल्फी’ आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी केले. त्या आंदोलनाची दखल थेट बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना घ्यावी लागली. मात्र, आता साताऱ्याच्या पालिकेवर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. त्यांच्या पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून खड्डे भरण्यात येत नसल्याने भाजपने केलेल्या अनोख्या आंदोलनाची चर्चा साताऱ्यात रंगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)