राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी होणार नवीन चेहऱ्याची नेमणूक

पुणे, दि.29 – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा ऍड. वंदना चव्हाण यांची राज्यसभेवर फेरनिवड झाल्याने त्यांच्याकडे शहराध्यक्षपद राहणार का, या विषयी चर्चा सुरू असतानाच पक्षाचे नेते अजित पवार यांनी नवीन चेहऱ्याला संधी देणार असल्याचे गुरुवारी सांगितले. त्यामुळे शहराध्यक्ष बदलणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, नवीन चेहरा कोण असणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सूकता निर्माण झाली आहे.

चव्हाण यांच्याबद्दल पक्षात नाराजी होती. त्याबद्दल नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तरीही पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांनाच संधी दिली होती. खासदार आणि शहराध्यक्षपद अशी दोन्ही पदे त्यांच्याकडे होती. त्याबद्दलही पक्षात नाराजी होती. खासदारपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी ही नाराजी पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली. याशिवाय शहराध्यक्षांचे बीडीपी आणि पर्यावरण विषयक धोरण पक्षातील काही जणांना मान्य नाही. त्याविषयीही अनेकदा पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अन्य नेत्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष बदलाचे वारे जोराने वाहत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पक्षाच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी चव्हाण यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर संधी देत महिला आणि पुण्याचा सन्मान केल्याचे सांगितले. त्यामुळे शहराध्यक्षपदी नवीन चेहरा देण्याची इच्छा असून, ज्याच्यावर ही जबाबदारी येईल त्यानी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेले पाहीजे. त्याचबरोबर युवक संघटनेसह अन्य संघटनांनी योग्य पध्दतीने जबाबदारी ओळखून काम केले पाहीजे. वातावरण निर्मितीने निवडणुका जिंकता येत नाही. त्यामुळे आतापासून बुथ वाईज 25 युवकांची नेमणूक करावी. आपआपसातले तंटे मिटवून एकजूटीने काम करा, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिली.

……………….
पक्षात जो काम करतो त्यालाच संधी दिली पाहीजे. केवळ अजित पवारचे गुणगाण गाणारा, त्यांच्या मागे फिरतो म्हणून पदे देऊ नका. पदे देताना सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांचा समावेश करा. त्यामध्ये तरूण, विद्यार्थी आणि महिलांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष द्या. – अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)