जयंत पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी; शरद पवार यांनी केली घोषणा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या निर्णयासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर या बैठकीत महत्वपुर्ण चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार, खासदार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
4 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)