राष्ट्रवादीच्या पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी चेतन तुपे

14 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नेमणूका

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटन बांधणीवर भर दिला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी 14 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. याशिवाय चार जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांसह कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने काही ठिकाणी नव्या चेहछयांना संधी दिली आहे.

ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. परांजपे यांच्या मदतीला कार्याध्यक्ष म्हणून संजय वढावकर यांना नेमण्यात आले आहे. ठाणे ग्रमीण जिल्हाध्यक्षपदी दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवलीसाठी रमेश हनुमंते, उल्हासनगरसाठी आमदार ज्योती कलानी, भिवंडी शहरासाठी खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष म्हणून अनिल फडतरे यांची नियुक्ती कायम राहिली आहे.

पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी चेतन तुपे तर सांगलीत संजय बजाज यांना पक्षाने संधी दिली आहे. पक्षाने कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी आर. के. पोवार यांना कायम ठेवले आहे. कोल्हापूर ग्रमीणसाठी अध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील तर कार्याध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नेमणूक झाली आहे. सोलापूर शहराध्यक्ष पदावरून मनोहर डोंगरे यांना हटवून भारत जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तर कार्याध्यक्ष म्हणून संतोष पवार यांना संधी मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे उर्वरित जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पुढीलप्रमाणे :
जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष-रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष-विलास पाटील, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष- माणिकराव विधाते, परभणी ग्रमीण जिल्हाध्यक्ष- आमदार बाबाजानी दुर्राणी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष-आमदार ख्वाजा बेग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)