राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह- जयंत पाटील

मुंबई: गेल्या काही दिवसापासून अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणूकीकडे साऱ्यांच लक्ष लागल होतं. शिवसेना हा नगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना महापालिकेत सत्ता स्थापन करणार असे वाटत असतानाच नगरमध्ये मात्र भाजपने बाजी मारली आहे.

अहमदनगरमध्ये महापालिकेच्या महापौरपदी बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी सुध्दा भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे.वाकळे यांनी 37-0 असा विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपाच्या 4 आणि 1 अपक्ष अशा 37 नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चक्क नेहमी विरोधात राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षय जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले, अहमदनगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत महानगरपालिकेची निवडणूक लढले होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. सर्व संबंधित नगरसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मी दिले आहेत. या नोटीसांना उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)