राष्ट्रवादीच्या उमेदवार भक्‍ती टण्णू यांचा बाळाला घेऊन प्रचार

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी मत देण्याचे आवाहन
सांगवी, दि. 17 (वार्ताहर)- नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग क्र. 31 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इतर मागासवर्गीय महिला (ब) गटातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार भक्ती गौरव टण्णू या आपल्या तीन महिन्याच्या चिमुकल्यासह प्रचारात उतरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भक्ती टण्णू नगरसेवकपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांनी आपल्या तीन महिन्याच्या बाळासह राजीव गांधीनगर, गजानननगर, कीर्तीनगर, समर्थनगर, विनायकनगर, समतानगर, विवेकानंदनगर आदी परिसरात प्रचाररॅली काढत परिसर पिंजून काढला. तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
बाळासह प्रचारात उतरलेल्या भक्ती टण्णू या सध्या चर्चेत असून, नवी सांगवी-पिंपळे गुरवमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वेळी नागरीकांशी संवाद साधताना टण्णू म्हणाल्या की, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवित आले आहे. यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर, रक्‍तदान शिबीर, ब्लॅंकेट वाटप, मोफत चष्मे वाटप, पाणी वाटप, कुकिंग क्‍लास, मोफत आरोग्य तपासणी शिबीरे, स्त्री भ्रूणहत्या जनजागृती, पोलीस मित्रांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, मास्कवाटप, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवित परिसरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आगामी काळात प्रभाग सुसंपन्न, सुरक्षित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी जनजागरण यासाठी प्रयत्नशील आहे. सोसायट्यांमधील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य, महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम, सर्व जाती-धर्माचे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य असणार आहे. समाजाच्या विकासाची ही गंगा अधिक वेगाने वाहती राहावी, यासाठी पुढील पाच वर्षे विविध प्रकल्प राबवणार आहे. या निवडणुकीत उमेदवारांची खूप गर्दी झाली आहे. अशावेळी सतत लोकसंपर्कात असल्याने आपल्यासारख्या “काम करणाऱ्या’ उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असे सांगतानाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी मत देण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)