राष्ट्रवादीच्या आंदोलनात भाजपवर प्रश्‍नांचा भडीमार

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपवर प्रश्‍नांचा भडीमार करण्यात आला.

यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपने दिलेल्या विविध आश्वासनांचे काय झाले ? शास्तीकराचे काय झाले? पारदर्शक कारभाराचे काय झाले? बोपखेलच्या पुलाचे काय झाले? रिंगरोडचे काय झाले? नियमित पाणीपुरवठ्याचे काय झाले? स्मार्ट सिटीचे काय झाले? अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्‍नांचे फलक देखील हातात घेतले होते.

या आंदोलनात माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका गीता मंचरकर, सुमन पवळे, नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक काळूराम पवार, फजल शेख आदी कारकर्ते सहभागी झाले होते. या विषयाबाबतीत 15 दिवसांत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मनपा आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, रिंग रोड प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. निवडणूकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या जाहिरनाम्यात सर्व सामान्य नागरीकांसाठी अनेक आश्वासने दिली होती. परंतु आजतागायत एकाही आश्वसनांची पूर्ती केली गेलेली नाही, अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, व रिंगरोडचा प्रश्न अजूनही सोडविण्यास सत्ताधारी पक्षाला यश आलेले नाही.

राज्य सरकारने अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी अधिसूचना काढली परंतु जाचक अटी-नियम व अतिशय क्‍लिष्ट अशा पद्धतीमुळे मार्च 2018 पर्यंत केवळ 8 अर्ज महापालिकेत जमा आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शास्तीकराच्या बाबतीत देखील चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला गेला. 600 चौरस फुटापर्यंत माफ , 601 ते 1000 चौरस फुटापर्यंत 50% शास्ती कर व 1000 चौरस फुटाच्या वरील बांधकांना दुप्पट अशा प्रकारचे शासनाचे धोरण हे पूर्णत: चुकीचे आहे. रिंगरोडच्या बाबतीत एक ही नागरिक बेकार न होता व त्यांचे घरावर हातोडा न फिरविता विकासकामे झाली पाहिजेत. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण काम करीत असताना जनतेच्या हिताच्या दृष्टीन निर्णय घेण्याची आपली भूमिका असावी. सत्ताधारी पक्षाला चुकीच्या पद्धतीने निर्णय घेण्यास परावृत्त करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)