राष्ट्रवादीचे हल्लाबोल नव्हे डल्लामारो आंदोलन – पालकमंत्री

पुणे : राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याकडे सध्या काम नसल्याने ते बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकारच्या विरोधात सुरू असलेले “हल्लाबोल आंदोलन’ नव्हे तर “डल्लामारो आंदोलन’ सुरू असल्याचे उत्तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना सध्या काहीच काम नाही. त्यामुळे ते सध्या बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत आहेत असे बापट म्हणाले. त्याचाच एक भाग राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना बापट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणात पालकमंत्री गिरीश बापटही सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुंडे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)