राष्ट्रवादीला एकाच दिवशी दोन झटके

नवी दिल्ली – राफेल करारावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते. या पवार यांच्या भूमिकेबद्दल देशामध्ये एक  वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी राजीनामा देण्यास सुरुवात केलेली आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत नाहीत म्हणून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देत आहेत. यामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव मुनाफ हकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव ‘तारीक अन्वर’ यांनी लोकसभेतल्या आपल्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)