राष्ट्रवादीचे महापालिकेसमोर टाळ-कुटो आंदोलन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या कामात आणि महापालिकेच्या विविध विकासकामात सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती विठ्ठल-रुक्मिणी मुर्ती खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा चुनावी जुमला बनविलेल्या सत्ताधारी भाजपचे हात भ्रष्टाचारात अडकले असल्याचे आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महापालिके भवनासमोर टाळ-कुटो आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. मोरवाडीतील अहिल्याबाई पुतळ्यापासून महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका उषा काळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, निकिता कदम यांच्यासह युवक कार्यकर्ते व पदाधिकारी हे सहभागी झाले होते. सत्ताधारी भाजपकडून संत संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात टाळ-कुटो आंदोलन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘संतपीठात पैसे खाणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’, ‘विकास कामात कमिशन खाणाऱ्या आयुक्तांचा निषेध असो’, ‘स्थायी समिती सभापतीचा निषेध असो’, ‘सत्ताधारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशाही घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)